Tiranga Times Maharastra
मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एका सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. मतदानानंतर तिने बोटावरील शाई दाखवत फोटो शेअर केला असून, या पोस्टमधून तिने थेट मराठी माणसासाठी मतदान केल्याचं सांगत लोकशाही आणि मार्करच्या शाईवर सूचक टोला लगावला आहे. “माझी भाषा, माझं अस्तित्व आणि माझं काम मराठीमुळेच आहे,” असं म्हणत तिने मराठी अस्मितेवर भर दिला. पोस्टच्या शेवटी “या वर्षी मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही, ते बघूया” या एका वाक्याने तिने राजकीय आणि सामाजिक चर्चेला नवी दिशा दिली आहे.
